। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुका कृषी विभागातर्फे दुर्गम ग्रामीण भागातील भोईघर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले, कृषी उपसंचालक दत्तात्रेय काळभोर, तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ मान्यवरांच्या हस्ते आत्मा योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकर्यांना शेवगा रोपांचे तर भाजीपाला उत्पादक शेतकर्यांना भाजीपाला बियाण्यांचे मिनी कीट वाटप करण्यात आले. यावेळी काशिनाथ वाघमारे, रमेश नागांवकर, कर्मचारी वृंद, शेतकरी,बागायतदार, आर. के. सैंदाणे,आदिराज चौलकर, अतुल उपाध्ये उपस्थित होते. या योजनेमध्ये शेतकर्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी मनीषा भुजबळ यांनी केले.