। उरण । वार्ताहर ।
श्री स्वामी समर्थ बेरोजगार सामाजिक संस्था जासईच्या महिला रणरागिणीनी सामाजिक बांधिलकी जपत चिरनेरच्या प्राथमिक आश्रम शाळेला एक स्मार्ट टिव्ही संच व कपाट भेट देण्यात आले. तसेच, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी साबण, कोलगेट आणि खाऊ वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी (दि.10) संस्थेच्या अध्यक्षा जयश्री ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा प्रिती म्हात्रे, सचिव सरिता म्हात्रे, खजिनदार स्वाती पाटील, शोभा म्हात्रे, निलम म्हात्रे, सरिता म्हात्रे, जयश्री पाटील, जनाबाई घरत, राजश्री म्हात्रे, ज्योती घरत, स्मिता म्हात्रे, पौर्णिमा कांबळे, कामिनी पाटील, लक्ष्मी म्हात्रेंसह आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, रामचंद्र मोरे, महादेव डोईफोडे, साधना शिंदे, शिवाजी साळुंखे आणि विद्यार्थी उपस्थित होते.