। खांब । वार्ताहर ।
मोबाईलने फार मोठी क्रांती केली आहे. मोबाईल आज आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. असे असले तरी मोबाईलचा वापर चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे, असे मार्गदर्शनपर विचार समुपदेशिका अपर्णा करंदीकर यांनी व्यक्त केले. रोहा तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथे संपन्न होत असलेल्या शारदोत्सव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन या आपल्या नियोजित कार्यक्रमात विद्यार्थी वर्गाला समुपदेशन करताना त्या बोलत होत्या. यावेळी मुख्याध्यापक दिपक जगताप, नरेंद्र माळी व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.