| चिपळूण | प्रतिनिधी |
सह्याद्री शिक्षण संस्थेची प्राथमिक शाळा खेर्डी-चिंचघरी (सती) ता.चिपळूण हे उपक्रमशील विद्यालय आहे. गुणवत्तेसोबत प्रत्येक गोष्टीची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभुती देण्याचा प्रयत्न असतो.
शेती हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. आपली अर्थव्यवस्था प्रामुख्याने कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. आपल्या शेतकरी राजाच्या कष्टाची जाणीव विद्यार्थ्याना व्हावी, शेतीची विविध कामे कशी केली जातात, याची माहिती विद्यार्थ्याना व्हावी यासाठी कृषी दिनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक अरविंद सकपाळ यांच्या संकल्पनेतून चिंचघरी गावातील शेतकरी दिनेश चाळके यांच्या शेताला विद्यार्थी व शिक्षकांनी भेट दिली. त्यांनीही विद्यार्थ्याना शेतीच्या कामाविषयी अतिशय माहिती सांगितली. यावेळी विद्यार्थ्यानी-शिक्षकांनी भात लावणीचा आनंद घेतला. यावेळी शेतकरी राजा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात दिनेश चाळके यांचा शाल व भेटवस्तू देऊन शाळेचे शिक्षक संदेश सावंत व विद्यार्थ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक सकपाळ, शिक्षिका मनिषा कांबळी, रश्मी राजेशिर्के, संदेश सावंत, अपूर्वा शिदे, विनया नटे, वृषाली राणे, अर्चना देशमुख, ज्योती चाळके, रूपाली खरात, वर्षा सकपाळ, शितल पाटील, स्वरा भुरण, शिक्षकेतर कर्मचारी विनोद उदेग, एकनाथ चाळके यांनी विशेष मेहनत घेतली.