| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळी हा सण भारतात मोठ्या स्तरावर साजरा केला जातो. ‘ईट्स प्ले रीड’ अभियानाच्या दृष्टिकोनातूनदेखील हा उत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. यंदा ही दिवाळी ईट्स प्ले रीड संस्थेच्या संस्थापक अपर्णा शहा यांचा अभियानासंदर्भातील हेतू घेऊन त्यांच्या राजदूतांच्या माध्यमातून जीवन ज्योती आश्रमात प्रेमळ भेट देण्यात आली.
आपण समाजाचे एक घटक म्हणून आपली ही समाजासाठी काही जबाबदारी आहे, आपल्या परीने आपण कार्य करावे, ईट प्ले रीडच्या माध्यमातून मी व माझी टीम एक अभियान राबवत आहोत जे समाजाच्या सवयीना चांगल्या सवयी मध्ये परिवर्तन करण्यात कार्यरत असल्याचे अपर्णा शाह यांनी सांगितले. केवळ खाणे नसून ते विचारपूर्वक खा, केवळ खेळ नसून मजेशीर खेळा, केवळ वाचन नसून कुतूहलाने वाचा हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. खारघरमधील आश्रमात अभियानांतर्गत सर्वसामान्य, असामान्य लोकांपर्यंत पोहोचून हा आनंद साजरा करण्यात आला. शारीरिक व मानसिक आजार असणार्या नागरिकांसोबत हितगुज साधून गप्पा गोष्टी करण्यात आल्या. संस्थेची ही भेट हा त्यांच्यासाठी खर्या अर्थाने दिवाळी आहे, असे त्यांनी व तेथील प्रबंधकांनी नमूद केले. दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आणि या गोड दिवशी गोड भेट करून गोड मिठाईचे वाटपही करण्यात आले.