आरोपीविरोधात गुन्हा दाखल
| नवीन पनवेल | वार्ताहर |
पंधरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून ती गरोदर राहिल्याप्रकरणी आरोपी सोहेला गफूर खान (18), रा. रोडपाली याच्याविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पंधरा वर्षीय मुलगी हिला आरोपी याने तू मला खूप आवडते असे बोलून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ती गरोदर राहिल्यानंतर संबंधित प्रकार नातेवाईकांना समजला. यावेळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी यातील आरोपीला अटक केली.