| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
80 वर्षीय महिलेच्या गळ्यातील 35 हजार रुपये किमतीचे सोन्याचे पदक चोरल्याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगलाबाई भोईर असे या महिलेचे नाव असून त्या नितळस येथे वास्तव्यास आहेत. त्या दि.18 एप्रिल रोजी एका कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्या होत्या. त्या रात्री 9.00 वाजताच्या सुमारास घरामध्ये बसल्या होत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्याजवळ जात त्यांच्या गळ्यातील सोन्याचे पदक खेचून तो अंधारात पळून गेला.





