| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
रस्त्यावरील क्षुल्लक कारणावरून शिवीगाळ करून चाकू आणि बेसबॉल लोखंडी स्टिकने मारून जखमी केल्याप्रकरणी कारचालकाविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पायल चौधरी असे या महिलेचे नाव असून त्या रिसवाडी येथे वास्तव्यास आहेत. त्या दि.23 एप्रिल रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास मोटरसायकलवरून कळंबोली येथून रसायनी येथे घरी जात होत्या. पावणे एकच्या सुमारास डी मार्ट समोर पळस्पे फाटा जवळून जात असताना दुसऱ्या गाडीला जाण्यासाठी रस्ता कमी पडत होता. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून चारचाकी गाडी चालक त्यांना ओव्हरटेक करायला लागला. त्यावेळी कारचालकाने पीडित महिलेला शिवीगाळ करत कारमधून खाली उतरला. त्याने कारच्या डिकीमधून लोखंडी स्टिक आणि चाकू काढून पायलच्या हातावर मारून तिला जखमी केले.






