| चिरनेर | वार्ताहर |
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून उरण तालुक्यातील पूर्व विभागातील आवरे, गोवठणे, पाले, पिरकोन, पुनाडे, पुनाडेवाडी, वशेणी, सारडे, कोप्रोली, मोठी जुई, कळंबुसरे या प्राथमिक शाळांतील 1000 विद्यार्थ्यांना नुकतेच वह्यांचे वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम मनोहर भोईर व शिवसेना उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मनोहर भोईर यांनी अलीकडे पालकांचा कल इंग्रजी माध्यमाच्या स्कूलकडे वळला आहे. त्यामुळे मराठी शाळांना गळती लागण्याची वेळ आली आहे. प्राथमिक शाळेतदेखील चांगल्या दर्जाचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे या शाळा टिकवून ठेवण्याची जबाबदारी पालकांची आहे, असे सूचित केले.
यावेळी विधानसभा संपर्कप्रमुख महादेव घरत, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष रोहिदास पाटील, उपतालुकाप्रमुख मधुसूदन पाटील, म.आ.उपजिल्हा संघटिका ममता पाटील, उपतालुकासंघटक रुपेश पाटील, युवासेना तालुका अधिकारी हितेश म्हात्रे, विधानसभा संघटिका ज्योती म्हात्रे, तालुका संघटिका भावना म्हात्रे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, मुख्याध्यापक व शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.







