| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायत पोयनाड हद्दीतील भाकरवड राजिप शाळा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थी, शिक्षक वृंद यांना एस.पी. फाऊंडेशनच्यावतीने छत्री वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी प्रथम शाळेच्या वतीने एसपी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सनिल बाळाराम पाटील यांच्या 38 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लक्ष्मण पाटील, तर शिक्षण तज्ञ अरुण राऊत, शाळेची मुख्याध्यापिका साधना पाटील, रजनी पाटील, युगंधरा पाटील, प्रतीक्षा पाटील, सहाय्यक शिक्षक धीरज पाटील, अंगणवाडी सेविका वैशाली पाटील, मदतनीस समिता पाटील, काशिनाथ पाटील, लता पाटील, नारायण कृष्णा पाटील, नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील, राजेंद्र पाटील, चिंतामण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या एकूण 45 विद्यार्थ्यांना लाभ मिळाला. एस. पी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सनील पाटील हे दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत असतात. अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, गोरगरीब यांना सडल हस्ते मदत करत असतात. त्याच अनुषंगाने त्यांनी यावेळी भाकरवड गावातील शाळा व अंगणवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम सागर पाटील, किरण पाटील, वैभव पाटील यांच्या नियोजनाखाली केला आहे. यावेळी रजनी पाटील यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्रामस्थांचे शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षवृंद, व्यवस्थापन समिती यांनी सेवेची संधी उपलब्ध करून दिली याबद्दल सर्वांचे आभार मानले.
भाकरवड शाळेत छत्री वाटप
