बेणसे ग्रामपंचायतीतर्फे गणवेश वाटप

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
बेणसे ग्रामपंचायतीच्या वतीने राजिप शाळा बेणसे येथील इयत्ता 1 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते उद्धव कुथे यांनी सांगितले की, बेणसे शाळेतील गुरुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर सर्वांगीण प्रगतीसाठी झटत असतात. या शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर विराजमान झालेले दिसतात. अनेक विद्यार्थी आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर देशसेवा व मायभूमीची सेवा करीत आहेत. ही बाब आमच्यासाठी अभिमानाची आहे, या प्रतिभावान विद्यार्थ्यांकडून या शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन आपली शैक्षणिक प्रगती साधावी, विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करून जीवनात एखादे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मेहनत घ्यावी व यशस्वी व्हावे. असे उद्धव कुथे म्हणाले.
यावेळी बेणसे ग्रामपंचायतीचे सरपंच मधुकर पारधी, माजी उपसरपंच तथा सदस्य उद्धव कुथे, माजी सरपंच तथा सदस्या प्रिती कुथे, सदस्य प्रगती गोरे, सदस्य सुलताना मांढरे, शिक्षक, शिक्षिका तसेच ग्रामपंचाय कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version