कर्जतमध्ये शेतकर्‍यांना युरिया खताचे वाटप

सुनील गोगटे यांनी जपली सामाजिक बांधिलकी

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत येथील माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चाचे कोकण संघटक सुनील गोगटे यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील 550 शेतकर्‍यांना युरिया खताचे वाटप करण्यात आले. खरीप हंगमात शेतकर्‍यांसाठी खत वाटप करण्याचा उपक्रम सुनील गोगटे यांच्या माध्यमातून गेली चार वर्षे आयोजित केला जात आहे.

कर्जत येथील रॉयल गार्डन येथे आयोजित कार्यक्रमाला भाजप किसान मोर्चा प्रदेश अध्यक्ष गणेश भेगडे, कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड, भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस पासवान, भाजप जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, किरण ठाकरे, रमेश मुंढे,मंगेश म्हसकर, वसंत महाडिक, राजेश लाड आदी मान्यवर उपस्थित होते. सुनील गोगटे यांच्या माध्यमातून सलग चौथे वर्षे खत वाटप केले असून, यावर्षी कर्जत तालुक्यातील 550 शेतकर्‍यांना युरिया बॅग यांचे वितरण हे शेतकर्‍यांना करण्यात आले. त्यासाठी तालुक्याच्या सर्व गावातील आणि आदिवासी वाडीमधील शेतकरी खत वाटप कार्यक्रमाला उपस्थित होते.

Exit mobile version