लाईफ फाऊंडेशन मुंबई व जीवनधारा संस्था कोलाड यांच्यामार्फत 50 कुटुंबांना भांडी व 500 मुलांना आरोग्य किट वाटप

कोलाड | वार्ताहर |
स्वातंत्र्यदिनानिमित्त रविवार, दि.15 ऑगस्ट रोजी कोलाड खरबाची वाडी येथील आदिवासी वाडीत लाईफ फाऊंडेशन मुंबई व जीवनधारा संस्था कोलाड यांच्या संयुक्त विद्यमानाने 50 कुटुंबांना भांडी व 500 मुलांना आरोग्य किट वाटप करण्यात आले आहे.
खरबाची वाडी नं.4 येथे 23 कुटुंबांना भांडी व 220 मुलांना आरोग्य किट तसेच कपडे वाटप करण्यात आले. भांड्यांमध्ये 1 कढई, 2 पातेलं, 2 मोठे चमचे, 1 ग्लास, 1 वाटी, 1 छोटा चमचा, 1 तवा व नवीन कपडेदेखील वाटप करण्यात आले. शिल्लक राहिलेले आरोग्य किट इतर वाड्यांमध्ये वाटप करण्यात आले. त्यामध्ये साबण, कोलगेट, टूथ ब्रश, कपड्याचे साबण, शाम्पू, कंगवा, निलकटर आणि मास्क अशा वस्तूंचा समावेश होता.
या सर्व वस्तू वाटपासाठी लाईफ फाऊंडेशनच्या संचालिका पूनम लाल वाणी, विनोद लाला, प्रदीप दाभाडे, कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव व त्यांचे सहकारी, निर्मला निकेतन मुंबई कॉलेजचे स्टुडंट व जीवनधारा संस्थेचा सर्व स्टाफ उपस्थित होता. यावेळी येथील नागरिकांनी लाईफ फाउंडेशन मुंबई व जीवनधारा संस्था कोलाड यांचे आभार मानले.

Exit mobile version