लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व शेअर अॅड केअर फाऊंडेशनचा उपक्रम
। कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील दुर्गम अशा डोंगराळ भागात, आदिवासी वाड्यांमध्ये 930 कुटुंबांना अन्नधान्याचे किट्स तसेच 250 कुटुंबांना हेल्थगार्ड किटचे वाटप लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व शेअर अॅड केअर फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले.
कर्जत तालुक्यामध्ये लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व शेअर अँड केअर फाऊंडेशन यांच्या माध्यमातून 930 कुटुंबांना अन्नधान्याचे किट्स वाटप तसेच 250 कुटुंबांना हेल्थगार्ड किटचे वाटप करण्यात आले. या हेल्थ गार्ड किटमध्ये ऑक्सीमिटर, डिजिटल थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क व सुचना पत्रक यांचा समावेश आहे.
संस्थेच्या संस्थापिका विली डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गौतम कनोजे (सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक), डॉ. गीतांजली हजारे, रविंद्र भोईर, तानाजी मिणमिणे, केशव कवठे, सौ. सारिका वेहले, सुरज अगिवले, दशरथ नाईक यांनी परिश्रम घेतले.