खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध साहित्याचे वाटप

| तळे | वार्ताहर |
खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत गरजूंना महिला व बालकल्याण समाज कल्याण अपंग कल्याण पंचायत समिती सेस या विभागामार्फत विविध वस्तूंचे वाटप पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पंचायत समिती तळा येथे मा. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात करण्यात आले.

यावेळी मंचकावर रा.जि.प. महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, पंचायत समिती सभापती अक्षरा कदम, जि.प. सदस्य बबन चाचले, उपसभापती गणेश वाघमारे, पंचायत समिती सदस्य देवकी लासे, तालुका प्रमुख नाना भौड, महिला आघाडी प्रमुख सौ. शिंदे, अ‍ॅड. उत्तम जाधव, तहसीलदार अण्णाप्पा कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख सौ. शिंदे, आशा सेविका, बचत गट महिला, अंगणवाडी सेविका व अधिकारी उपस्थित होते.

आज पंचायत समितीच्या सेस फंडातून महिला व बालकल्याण, समाज कल्याण व अपंग कल्याण विभागामार्फत घरघंटी, पापड लाटण्याचे मशीन, हार्मोनियम, पखवाज, टाळ, सतरंजी, वॉटर फिल्टर या सारखे महिला बचत गटांना व महिला मंडळांना उपयुक्त अश्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.

Exit mobile version