। पेझारी । वार्ताहर ।
रायगड जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभाग, झेप फाऊंडेशन आणि दीपक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीसाठी बचत गटांसाठी पापड यंत्र, सतरंजी आणि दळण मशीन या साहित्यांचे वाटप आणि तौक्ते चक्रीवादग्रस्त आदिवासी बांधवांसाठी जीवनावश्यक वस्तू आणि रेशन वाटप करण्याचा कार्यक्रम सुलभा पाटील हॉल आंबेपूर येथे आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये पेझारी, आंबेपूर, कुर्डुस, नागझरी, कुसुंबळे, वाघोडे, पोयनाड, शहाबाज या गावातील 20 महिला बचत गट आणि कोंझरवाडी, तळाशेत, चिखली, कुसुंबळे, खजरीवाडी, येसावाडी या आदिवासी वाड्यांतील जवळपास 500 आदिवासी बांधवांनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, राजिप सदस्या आणि झेप फाऊंडेशन संस्थापिका चित्रा पाटील, पंचायत समिती सभापती प्रमोद ठाकूर, पंचायत समिती सदस्या रचना थोरे, दीपक फाऊंडेशनचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक अजय आवाडे, झेप फाऊंडेशन सचिव संगीता माने, एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्प अधिकारी गीतांजली पाटील, विस्तार अधिकारी अपर्णा शिंदे, पर्यवेक्षिका भाग्यश्री पाटील, अलिबाग पर्यवेक्षिका विनोदिनी मोकल, पेझारी ग्रामपंचाय सरपंच प्राजक्ता म्हात्रे, कुसुंबळे ग्रामपंचायत सदस्या अपर्णा कोठेकर, स्वानंद कोठेकर, महेश पाटील, माजी पंचायत समिती सभापती विद्या म्हात्रे, श्रीगाव ग्रामपंचाय सरपंच यशोदा नाईक, पोयनाड ग्रामपंचाय सरपंच शकुंतला काकडे, समाजसेविका जीविता पाटील यांचे सहकार्य मिळाले.