सोनसडे येथे भाजीपाला बियाणे वाटप

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील सोनसडे येथे कृषी विभाग तळा आत्माअंतर्गत शेतकर्‍यांना भाजीपाला बियाणे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी गावचे अध्यक्ष देवजी गावडे, सचिव कृष्णा भोसले, रविंद्र पाटेकर, परशुराम भोसले, कृषी सहाय्यक योगेश कोळी व शेतकरी बंधू भगिनी उपस्थित होते. शेतकरी बांधवांना भाजीपाला लागवड करुन झाल्यानंतर जे बियाणे देण्यात येते त्याचा फारसा फायदा होत नाही. त्याचबरोबर यावेळी भेंडी, मिरची, पालक, व चवळी ही बियाणे आहेत. यामध्ये बदल करून कोकणात पडवळ, दुधी भोपळा, शिराळा, काळा भोपळा यासारखी परसबागेत फुलणारी बिबियाणे द्यावीत ही भाजी या भागात येते याचा विचार होणे गरजेचे आहे.

Exit mobile version