महिलांना भाजीपाला बियाण्यांचे वाटप

। पाली/बेणसे । वार्ताहर ।
कृषी दिनाचे औचित्य साधून पंचायत समिती सुधागड कृषी विभाग तालुका कृषी विभाग व तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने सुधागड तालुक्यातील महिला स्वयंसहायता समूहातील महिलांना भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

सभापती रमेश सुतार, पंचायत समिती सदस्य साक्षी दिघे, गटविकास अधिकारी गजानन लेंडी, पंचायत समिती कृषी अधिकारी चौधरी, तालुका कृषी अधिकारी जे.बी. झगडे यांच्या हस्ते भाजीपाला बियाणे वाटप करण्यात आले.

यावेळी सभापती रमेश सुतार यांनी सद्यःस्थितीत शेती ही किती महत्त्वाची आहे. यासंदर्भात मार्गदर्शन केले. आजच्या काळात हेक्टरी शेतीचे रूपांतर गुंठेवारीत होत चालले आहे. मी स्वतः दोन तास रोज शेतात काम करतो, त्यामुळे शरीर निरोगी राहते, असे सुतार म्हणाले. आजच्या काळात सुशिक्षित वर्गाने जर शेतीकडे लक्ष दिले आणि आधुनिक पद्धतीने शेती केली, तर भरघोस उत्पादन घेता येईल, असे पंचायत समिती सदस्या साक्षी दिघे म्हणाल्या. नवनवीन तंत्रज्ञानाचा व पद्धतींचा सध्या शेतीमध्ये वापर करून शेतीत उत्पादकता कशी वाढवता येईल याबद्दल तालुका कृषी अधिकारी जे.बी. झगडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमास चंद्रशेखर पाटील, अनुराधा गायकवाड, कैलास आघाव व पंचायत समिती विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच स्वयंसहायता समूहातील महिला उपस्थित होत्या.

Exit mobile version