पक्षांसाठी वॉटर बाऊलचे वितरण

। खोपोली । प्रतिनिधी ।
वॉटर फॉर व्हाईस लेस या राष्ट्रीय स्तरावर प्राणी पक्षांच्या संवर्धनासाठी आणि मदतीसाठी काम करणार्‍या संस्थेच्या माध्यमातून श्री कृपा एक्वेरियम आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने भगवान महावीर जयंतीचे औचित्य साधून खोपोली शहरात फ्री वॉटर बाऊलचे वितरण करण्यात आले.

वॉटर फॉर व्हाईस लेस या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील 25 शहरात साठ हजार वॉटर बाऊल वितरण करण्याचे लक्ष असून त्यासाठी शंभर मुख्य सदस्य रात्रंदिवस काम करत असल्याची माहिती संस्थेचे रायगड जिल्हा प्रमुख दिवेश राठोड यांनी दिली. या वितरण कार्यक्रमात वासुदेव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष किशोर ओसवाल, श्री कृपा एक्वेरीयमचे प्रवीण शेंद्रे, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर, वर्षा मोरे आणि शहरातील प्राणी मित्र उपस्थित होते.

Exit mobile version