शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरचे वाटप

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

ऑक्टोबर सेवा सप्ताहाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ अलिबागच्या सौजन्याने वॉटर प्युरिफायरचे वाटप नुकतेच मुरुड तालुक्यातील मांडला, वळके या शाळेत करण्यात आले. यावेळी डिस्ट्रिक्ट व्हॉइस गव्हर्नर लायन प्रवीण सरनाईक, साईट फर्स्टचे डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन लायन एस.एन. मूर्ती, अलिबाग लायन अध्यक्ष अ‍ॅड. गौरी म्हात्रे, लायन सचिव महेश कवळे, खजिनदार अंकिता म्हात्रे, फर्स्ट व्हीपी प्रदीप नाईक, डिस्ट्रिक्ट चेअरमन कम्युनिटी सर्व्हिस गिरीश म्हात्रे, अविनाश राऊळ, अतुल वर्तक, महेंद्र पाटील, संतोष पाटील, संजय मोरणकर, मनोज ढगे, प्रकाश देशमुख, चित्रा वर्तक, केंद्रप्रमुख सुनील पाटील, सुधीर नाईक यांच्यासह शिक्षक आणि लायन्स परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी वळके केंद्रातील शिक्षिका मंजिरी गायधनी यांनी शाळांमध्ये वॉटर प्युरिफायरची आवश्यकता आपल्या रुपाने पूर्ण झाल्याबाबत लायन्स क्लब अलिबागचे आभार मानले.

Exit mobile version