दोन बोटी आणि वाळू हौद केले नष्ट
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पनवेल तालुक्यातील खारघर खाडी भागात आज (दि.15 नोव्हेंबर) रोजी अनधिकृतपणे वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव आणि पनवेल उपविभागीय अधिकारी, श्री.राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तहसिलदार श्री. विजय तळेकर यांच्यासह मंडळ अधिकारी सुनील पाटील व इतर कर्मचाऱ्यांनी अनधिकृत गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर धडक कारवाई केली.
या कारवाईत या पथकाने दोन बोटी व वाळूचे हौद नष्ट केले. संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार विजय तळेकर यांनी दिली आहे.