पाली/बेणसे | प्रतिनिधी |
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार पाली नगरपंचायतीची सदस्य पदांच्या आरक्षणाची (ना.मा.प्र) सोडत कार्यक्रम सोमवारी (ता.15) येथील भक्त निवास क्रमांक एक मध्ये संपन्न झाली. आधीच्या सोडतीमध्ये नवीन सोडतीमुळे बदल झाला त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये कही खुशी कही गम पाहायला मिळाले.
प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने, पाली नगरपंचायत मुख्याधिकारी अंगाई साळुंखे, तहसीलदार तथा प्रशासक दिलीप रायण्णावार, नायब तहसीलदार दिलीप कोष्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा गीता पालरेचा, भाजप दक्षिण रायगड उपाध्यक्ष राजेश मपारा आदी पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
असे आहे आरक्षण
प्रभाग क्रमांक 1, 10, 11, 12, 15 व 16 सर्व साधारण महिला, प्रभाग क्रमांक 4, 6, 7, 9 व 13 सर्व साधारण (खुला), प्रभाग क्रमांक 2, व 14 नागरिकांचा मागास प्रवर्ग (खुला), प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती महिला, प्रभाग क्रमांक 5 व 8 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जाती (खुला) असे आरक्षण जाहीर झाले आहे.