| पनवेल | वार्ताहर |
स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त लायन्स क्लब ऑफ पनवेल आणि नवी मुंबई स्पोर्टस व सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नवीमुंबई व रायगड जिल्हा अजिंक्यपद टेबलटेनिस स्पर्धेचे आयोजन सिडको समाजमंदिऱ नवीन पनवेल येथे रायगड जिल्हा टेबलटेनिस असोसिएशनचे अध्यक्ष संजय कडू यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली.
स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ आ. प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विजय पाटील़, संजीव सूर्यवंशी, हेमंत ठाकूर, नंदकिशोर धोत्रे, राजेद्र जेसवानी़ संजय पोतदाऱ, नागेश देशमाने़, अशोक गिल्डा़, मधुकर भगत़, के.एस.पाटील, मदन गोवारी़, संजय गोडसे़, मनोज म्हात्रे, गौतम म्हस्के, मीना पोतदाऱ, ज्योती देशमाने़, भावना जेसवानी़ शोभा गिल्डा़, नूतन धोत्रा उपस्थित होते. स्पर्धेचे चीफ रेफरी पराग अंकोलेकर होते.यावेळी विविध ग्रुपमध्ये विजयी झालेल्या स्पर्धकांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.






