| नागोठणे | वार्ताहर |
कोकण एज्युकेशन सोसायटीच्या नागोठण्यातील कै. बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुलात स्थानिक व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र जैन यांच्या हस्ते ध्वजारोहण केल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.
कोएसोचे येथील गु.रा. अग्रवाल विद्यामंदिर, कै. स.प्र. जैन कनिष्ठ महाविद्यालय तसेच आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालय, नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमानाने संपन्न झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमाला स्थानिक व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिल काळे, सदस्या अॅड. सोनल जैन, अग्रवाल विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.के. पाटील, प्रा. डॉ. संदेश गुरव, मुख्याध्यापिका जाधव मॅडम आदींसह सर्व शिक्षक, कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.