| सुतारवाडी | वार्ताहर |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा पहूर येथे सॉल्वे स्पेशालिटी इंडिया लि. धाटाव-रोहा यांच्यातर्फे आदिवासी तसेच गरीब गरजू विद्यार्थ्यांना पहूर ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश कदम यांच्या हस्ते वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. दरवर्षी या कंपनीच्या वतीने येथील आदिवासी आणि गरीब गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या दिल्या जातात.
यावेळी नितेश कदम यांच्यातर्फे दहा विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. दरम्यान, सरपंच मंगेश कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तेजस काळोखे, अश्विनी शिंदे, अंकुश शिंदे, मारुती कदम, काशीराम मांडवकर, दत्ताराम कदम, नितेश कदम, आत्माराम शिंदे, दामाजी कदम, कमलेश मोंडे तसेच पहूर ग्रामस्थ प्राथमिक शाळा पहूरचे मुख्याध्यापक श्री. साटम, सर्व शिक्षक, बालवाडी, अंगणवाडी सेविका आदि उपस्थित होते.