जिल्हा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न

| कर्जत । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील बाबा इंटरनॅशनल स्कुल येथे जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने, कर्जत येथील नॅशनल इंस्ट्रक्टर व प्रशिक्षक सागर वाघमारे तर्फे जिल्हातील सात, नऊ, एकोणावीस वर्षाखालील बुद्धिबळ संघाची निवड करण्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी अलिबाग, पनवेल, नागोठणे, पेण, खोपोली व कर्जत तालुक्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.


स्पर्धेच्या उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे चंद्रशेखर पाटील, प्रा.अ‍ॅड.आशा ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा निवड चाचणी स्पर्धेतून निवड झालेले स्पर्धक 7, 9 व 19 वर्षाखालील गट अनुक्रमे पुणे, औरंगाबाद, गोंदिया येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रायगडचे प्रतिनिधित्व करतील. विजेत्या स्पर्धकांनी रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे यांच्याबरोबर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे :-
सात वर्षाखालील गट :
मुले-आरव राज (पनवेल) मुली सावी गेजी (पनवेल)
नऊ वर्षाखालील गट : मुले -प्रथम-आरव राज (पनवेल), द्वितीय – पोखरकर अथांश, तृतीय -अद्वय ढेणे, उत्तेजनार्थ -आयाण मोडक, आयुष चवरे
नऊ वर्षाखालील गट : मुली-प्रथम -आरणा खेदू (अलिबाग), द्वितीय अनन्या माने, तृतीय – शौर्या आमले
एकोणावीस वर्षाखालील गट : मुले प्रथम -आयुष दिपनायक (पनवेल) शंतनु पेंडसे (अलिबाग) सुयश मंचेकर (नागोठणे) हिमांशु डंगर (अलिबाग) कविश कागवाडे (पनवेल)
एकोणावीस वर्षाखालील गट : मुली-प्रथम -ज्ञानदा गुजराथी (कर्जत) कनिष्का केसर (पनवेल)

स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून सी. एन. पाटील, संगणक पंच अंकित जोशी व गोपीनाथ डंगर यांनी काम पहिले. स्पर्धेचा बक्षीस समारंभ सोहनी यांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version