निवडणुकीच्या तयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

| पनवेल | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद व पनवेल पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 7 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक तयारीला वेग आला आहे. पनवेल येथील वि. खे. हायस्कूलमध्ये निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक साहित्य, यंत्रणा व व्यवस्थांची तयारी सुरू करण्यात आली आहे. या तयारीची जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

यावेळी प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी मतदान प्रक्रियेसाठी लागणारे साहित्य, कर्मचाऱ्यांची नियोजनबद्ध नियुक्ती, तसेच केंद्रावरील सुविधा यांची माहिती दिली. निवडणूक कामकाज सुरळीत पार पडावे यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. दरम्यान, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रशासनाकडून सर्व तयारी अंतिम टप्प्यात आणण्यात येत आहे.

Exit mobile version