यश मानेचे सुयश
| सोगाव । वार्ताहर ।
नुकतीच अलिबाग तालुक्यातील खारेपाटातील बेलपाडा येथे रायगड जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत 40 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. तसेच स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती. या स्पर्धेत मूनवली येथील व्यायाम शाळेचा विद्यार्थी यश पांडुरंग माने याने सहभाग घेत रायगड जिल्ह्यातुन 10 वा क्रमांक पटकावला तर खारेपाटमधून 5 वा क्रमांक पटकावला. यावेळी यश माने यास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले होते.
यश माने यांनी कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल तसेच, आपल्या मूनवली व्यायाम शाळेचे नाव यशोशिखरावर नेल्याबद्दल मूनवली येथील सचिन घाडी, निकेश अनमाने, अशोक मोंढे, विजय मोरे, केतन नाईक, सुबोध खाडे, नितेश ठकरूळ, अभिषेक जुईकर, समीर ठकरूळ, अक्षय नागावकर व इतर सहकार्यांसह मूनवली व्यायाम शाळेत जाऊन यश माने याचे कौतुक करत सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.