वांगणी येथे जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

| सुकेळी | वार्ताहर |

श्री.एकनाथदादा ठाकूर मित्रमंडळ वांगणी यांच्यावतीने भव्य अशा जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन शनिवार 6 मे रोजी रात्री 8.30 वाजता करण्यात आले आहे. यामध्ये ग्रुप नृत्य व वैयक्तिक नृत्य सादरीकरण होणार आहे.

या स्पर्धेत ग्रुप नृत्यामध्ये प्रथम क्रमांक 5,001रु. व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 3,001रु. व आकर्षक चषक तसेच तृतीय क्रमांक 1111 रु. व आकर्षक चषक देण्यात येईल. त्याचप्रमाणे वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक 2222रु व चषक, द्वितीय क्रमांक 1,555 रु. व चषक तर तृतीय क्रमांक 1,111 रु. व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ग्रुप व वैयक्तिक नृत्यासाठी उत्तेजनार्थ चषक देण्यात येईल.या स्पर्धेत ग्रुप डान्ससाठी 100 रु. तर वैयक्तिक डान्ससाठी 50 रु. प्रवेश फी ठेवण्यात आली आहे.

या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी चेतन दळवी मो.नं. 9545460060, भरत यादव मो.नं. 9545763108, प्रतिक तेलंगे मो.नं. 8796857960, प्रविण कदम मो.नं. 8459019057, तसेच तेजेश ठाकूर मो.नं. 9527027423 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version