। नागोठणे । वार्ताहर ।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व संकल्प मित्र मंडळ वांगणी (ता.रोहा) यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य अशा जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन शनिवारी (दि.21) रात्री 9 वाजता करण्यात आल्याची माहिती या स्पर्धेचे आयोजक, वांगणीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य एकनाथ ठाकूर यांनी दिली. या जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेत समूह तसेच वैयक्तिक नृत्याची जुगलबंदी पहावयास मिळणार आहे.
या स्पर्धेमध्ये प्रथम येणार्या 35 स्पर्धकांस प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच स्पर्धकाने गाण्याची सि.डी व मेकपचे सामान स्वतः सोबत आणायचे आहे. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक 5001 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 3001 व चषक, तर तृतीय क्रमांक 1111 व चषक देण्यात येणार आहेत. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक 2222 व आकर्षक चषक, द्वितीय क्रमांक 1555 व चषक, तसेच तृतीय क्रमांक 1111व चषक देऊन गौरविण्यात येणार आहेत.
तरी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी चेतन दळवी 9545460060, भरत यादव 9209506281, मनिष तेलंगे 8007663411, प्रविण कदम 8459019057, तेजस ठाकूर 9527027423 व अनिल लाड 8446920840 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक एकनाथ ठाकूर यांनी केले आहे.