| खांब | प्रतिनिधी |
पावसाळी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतीची योग्य तयारी करून आधुनिक व सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करावा, या उद्देशाने पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने कृषी मार्गदर्शनपर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कृषी अधिकारी तसेच परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सहा.कृषी अधिकारी चिल्हे अमित आढारी, कोलाड अनिकेत ननावरे, भालगाव विवेक खांडेकर, नागोठणे अनामिका मोरे, ऐनघर ऋषिकेश कदम आदी अधिकारी वर्गासह धोंडू कचरे, सखाराम कचरे, पांडुरंग गोसावी, चंदू गोसावी, गणेश भादावकर, सुदाम जाधव, सहदेव कचरे, यशवंत माहित, चंद्रकांत शेलार, दामोदर शेलार, जगदीश गोसावी, सचिन जाधव, विश्वास राऊत, महिला यमुना कचरे, सुशीला कचरे, सविता कचरे, माई जाधव, पूजा गोसावी, संगीता कचरे, सहादेव बाईत, सुदाम कचरे आदी शेतकरी बांधव भगिनी उपस्थित होते.
यावेळी पावसाळ्यापूर्वी शेतीची मशागत, पेरणीपूर्व तयारी, योग्य बियाण्यांची निवड, बियाणे प्रक्रिया, माती परीक्षणाचे महत्त्व तसेच पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय रासायनिक खतांचा कमी वापर करून सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करण्यासाठी दशपर्णी द्रावण तयार करण्याची पद्धत प्रत्यक्ष उदाहरणांसह समजावून सांगण्यात आली. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देत शेतीमधील खर्च कमी करून उत्पादन वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना स्पष्ट केल्या. उपस्थित शेतकरी वर्गाने या मार्गदर्शनाचा मोठा लाभ झाल्याची भावना व्यक्त केली. कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्या तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून आगामी खरीप हंगामासाठी त्यांना योग्य दिशा मिळाल्याचे मत व्यक्त करण्यात आले.







