आई जिजाऊ गोंधळ मंडळ चरीचा प्रथम क्रमांक
| भाकरवड | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील चॉकीचापाडा येथे रविवार (दि. 16) नवजवान सेवा मंडळ चौकीचापाडातर्फे जिल्हास्तरीय गोंधळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. स्पर्धेचे उद्घाटन माजी जिप आस्वाद पाटील, बाळू पाटील, संदेश बैकर यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी गोधळ मंडळाकडून कोणत्याही प्रकारची प्रवेशफी आकारण्यात आली नव्हती. गोंधळ, मुंज, लग्नसोहळा, आणि आपल्या कुलदैवत श्री खंडोबा यांना साकडे घातले जाते आणि सर्व कार्य सुखकर होण्यासाठी विशेषतः गोंधळ जागरण करण्याची परंपरा आज तागायत अविरत पणे चालू आहे.
या स्पर्धेत एकूण 14 गोंधळ मंडळानी सहभाग घेतला होता. त्यामध्ये श्रीराम गोंधळ मंडळ कमळपाडा, सफर गोंधळ मंडळ चॉकीचापाडा, हनुमान गोंधळ मंडळ देहेन, भैरवनाथ गोंधळ मंडळ शहाबाज, शिवज्योत गोंधळ मंडळ शहाबाज, आई जिजाऊ गोंधळ मंडळ चरी, चिरनेर गोंधळ मंडळ चिरनेर, जय मल्हार गोंधळ मंडळ चिखली, जय मल्हार गोंधळ मंडळ पोयनाड, एल कोट गोंधळ मंडळ शहापूर धेरंड, रामेश्वर गोंधळ मंडळ कातळ पाडा, गोंधळ मंडळ रावे पेण, जय हनुमान गोंधळ मंडळ मेढेखार, शिवज्योत गोंधळ मंडळ देहेन, सुरेश पवार गोंधळ मंडळ पोयनाड आदिंनी आपली अदाकारी पेश केली. या स्पर्धेसाठी माजी जिप सदस्या चित्रा पाटील, भूपेंद्र पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.
या स्पर्धेत आई जिजाऊ गोंधळ मंडळ चरी प्रथम क्रमांक पटकावला. तर व्दीतीय क्रमांक शिवभैरव गोंधळ मंडळ शहाबाज, तृतीय क्रमांक सफर गोंधळ मंडळ चॉकीचापाडा ठरले. या सर्वं विजेत्या गोधळी मंडळाला पंचायत समितीचे माजी सभापती बाळू पाटील, बाळकृष्ण जुईकर यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी महादेव गणपत जुईकर, जगदीश पाटील, बाळकृष्ण जुईकर, रूपेश जुईकर, एन.ए. पाटील, राजा म्हात्रे, रामदास मोकल, संदीप जुईकर यांनी काम पाहिले.