जिल्हास्तरीय भव्य कब्बडी स्पर्धा

कर्जतसंघ विजेता तर कुर्डुस संघ उपविजेता

| खारेपाट | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील नवयुवक क्रिडा मंडळ खिडकी आयोजित वैभव पाटील पुरस्कृत सरपंच चषक जिल्हारीय भव्य कब्बडी स्पर्धेत मिडलाईन कर्जत संघ विजेता ठरला, तर उपविजेता मातृछाया कुर्डुस तसेच विनायक दिवलांग तृतीय व जय हनुमान की कोपर हे संघ चतृर्थ क्रमांचे मानकरी ठरले. स्पर्धेत उत्कृष्ठ खेलाडू धिरज (कर्जत) उत्कृष्ठ चढाई अज्ञात ओसेकर, उत्कृष्ठ पकड प्रशांत ठाकूर व पबालिक हिरो हर्षद खुटकर (कर्जत). विषेश पारितोषिक चेतन पाटील दिवलांग, व स्पर्धेत शिस्तबध संघ मलेघर या सर्व खेळाडूंनी व संघानी उल्लेखनिय खेळी केली. सदर स्पर्धेत जिल्ह्यातील 32 संघ सहभागी झाले होते.

स्पर्धेचे उदघाटन वैभव पाटील, उज्वला पाटील, आल्हाद पाटील, अरविंद पाटील, राजेंद्र पाटील, जगदीश पाटील, हितेंद्र पाटील, प्रसन्न पाटील, चेतन पाटील, व्ही. कि. पाटील, धरमदास पाटील, जी.एस. पाटील, सिताराम पाटील, प्रतिक पाटील, धिरज पाटील, दर्शन पाटील, हर्षल पाटील, दामोदर पाटील, कल्पेश पाटील व उपस्थित झाला. या स्पर्धेला शेकापचे माजी आ. पंडित पाटील, आंबेपूर सरपंच सुमना पाटील, नंदकुमार पाटील, रविकांत पाटील, सुरेश गजने, तालुक्यातील आजी माजी सरपंच सदस्य व विविध स्थरातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

Exit mobile version