| उरण | प्रतिनिधी |
जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अलिबाग व पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथील सुधागड विद्यासंकुल मैदानात खो-खो स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सुधागड विद्या संकुलाचे प्रा. राजेंद्र पालवे यांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा 14,17 व 19 वर्षे या वयोगटातील पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमधील मुले व मुलींसाठी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत 14 वर्षे मुले प्रथम क्रमांक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्ञानमंदिर कळंबोली, द्वितीय महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी प्राथमिक विभाग कळंबोली. 17 वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी कळंबोली, द्वितीय आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके विद्यालय नवीन पनवेल यांनी मिळविला. 19 वर्षे वयोगट मुले प्रथम क्रमांक सु.ए.सोचे उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली, द्वितीय क्रमांक के.ए.ई. कळंबोली यांनी मिळविला.
14 वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक सु.ए.सोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, द्वितीय क्रमांक म.ए.सोचे ज्ञानमंदिर कळंबोली यांनी मिळविला. 17 वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक म.ए. सोसायटीचे ज्ञानमंदिर कळंबोली, द्वितीय सु.ए.सोचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, तर 19 वर्षे वयोगट मुली प्रथम क्रमांक के.आ. बांठीया विद्यालय नवीन पनवेल, द्वितीय क्रमांक सु.ए.सोचे उच्च माध्यमिक विद्यालय कळंबोली यांनी मिळविला. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सुधागड विद्या संकुलाचे प्रा. राजेंद्र पालवे, उपप्राचार्य कसबे, प्रा. संभाजी बडे, हर्षल पाटील, अधीक्षक दत्ता शिंदे, पर्यवेक्षक सुरेश शिंदे, विकास नाईक, एस.पी. पाटील आदी शिक्षकांनी मेहनत घेतली होती.