जिल्हास्तरीय शालेय खो-खो क्रीडा स्पर्धा नांदगाव विद्यालयात संपन्न

14 आणि 17 वयोगट मुले माणगांव तर 17 आणि 19 वयोगट मुली महाड अव्वल

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी आणि संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव तालुका सुधागड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय खो-खो स्पर्धेचे दि.13 व 14 डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते.

13 डिसेंबर रोजी झालेल्या मुलांच्या खो-खो क्रीडा स्पर्धेत 14 आणि 17 वयोगटात ना.म. जोशी विद्याभवन माध्य. विद्यालय गोरेगाव माणगाव, तर 19 वयोगटात केईएस मेहंदळे हायस्कूल रोहा या संघाने प्रथम क्रमांक मिळविला.

14 डिसेंबर रोजी झालेल्या मुलींच्या खो-खो क्रीडा स्पर्धेत 14 वयोगटात ना.म. जोशी विद्याभवन माध्य. विद्यालय माणगाव, तर 17 व19 वयोगटात कोएसोचे ग.दा. आंबेडकर विद्यालय बिरवाडी महाड या संघाने प्रथम क्रमांक पटकावला.

ही स्पर्धा गेली दोन दिवस खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या स्पर्धेसाठी भव्यदिव्य अशी क्रीडांगणे तयार करण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, पंच यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या स्पर्धेतील बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमप्रसंगी, भोराई शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेश खैरे, गटशिक्षणाधिकारी साधूराम बांगारे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक मनिषा मानकर, नांदगाव कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी ढोपे आणि शिक्षक वृंद तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version