द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन

| उरण । वार्ताहर ।
कला क्रीडा सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन या संघटनेतर्फे खेळाडू , कलाकार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, कौशल्यांना वाव देण्यासाठी, स्पर्धेतुन उतमोत्तम गुणीजण खेळाडू तयार करण्याच्या अनुषंगाने दि 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान वीर सावरकर मैदान, उरण शहर येथे राज्य स्तरीय फुटबॉल स्पर्धेचे तर दि 14 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता नवीन शेवा, शिवराय चौक, बिपीसीएल रोड, उरण येथे जिल्हास्तरीय वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू, स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष महादेव घरत यांनी केले आहे. dronagiri.sportsgmail.com या ईमेल द्वारेही प्रवेशिका/अर्ज स्वीकारण्यात येईल.अधिक माहितीसाठी द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनचे शिवेंद्र म्हात्रे-8291616826,सचिन पाटील -97684 85050, भारत म्हात्रे-9619596456 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version