|अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था अलिबागच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत सहकार पॅनलचे 18 उमेदवार निवडून आले आहेत. दिनांक 17 मार्च रोजी झालेल्या कार्यकारिणी निवडीमध्ये चेअरमन म्हणून सुशील वाघमारे, व्हाइस चेअरमन म्हणून निलेश साळवी, तर मानद सचिव म्हणून राजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड ही निवडणूक निर्णय अधिकारी काळे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली.
नवनियुक्त कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, मिलिंद वाड शाखाधिकारी सौ. गोळे, संदीप जगे व इतर अधिकारी देखील आवर्जून उपस्थित होते.सदर सभेसाठी पॅनल प्रमुख राजेंद्र म्हात्रे, राजेश सुर्वे, उदय गायकवाड, नरेंद्र गुरव, भगवान घरत, विजय पवार उपस्थित होते.तसेच प्रमोद भोपी, वैभव पिंगळे, राजेंद्र फुलावरे, देवानंद गोगर,नरेश सावंत, उमेश महाडेश्वर, जितेंद्र बोडके, प्रफुल्ल पवार, रविंद्र पालकर, बाळाजी गुबणारे, रेश्मा धुमाळ, प्रतिभा पाटील आदी संचालक मंडळ तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.