जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धा

वैभव शिंदेंने पटकावले विजेतेपद

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व अभिजित कॅरम क्लब, अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरूष एकेरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत कामोठे येथील वैभव शिंदे याने विजेतेपद पटकावले. पनवेलचा अश्रफ खान उपविजेता ठरला. अलिबागचा अभिजित तुळपुळे व पनवेलचा शाम भायवट यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

अलिबाग येथील क्रीडाभुवन येथे ही स्पर्धा खेळविण्यात आली. या स्पर्धेमध्ये रायगड जिल्ह्यातील 132 खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत विजेत्या खेळाडूस रोख रूपये 7000 व चषक, उपविजेत्यास रोख रूपये 5000 व चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांसांठी प्रत्येकी रोख रूपये 2500 व चषक, 5 ते 8 क्रमांसाठी प्रत्येकी रोख रूपये 1000 व चषक, 9 ते 16 क्रमांसाठी प्रत्येकी रोख रूपये 500 पक्षीस देण्यात आली.

कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष गिरीष तुळपुळे, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे सेक्रेटरी दिपक साळवी, स्पर्धेचे पंच प्रमुख आशिष बागकर यावेळी उपस्थित होते. अभिजित तुळपुळे तुळपुळे यांनी आभारप्रदर्शन केले.

Exit mobile version