रा.जि. मच्छीमार संघाचे माजी अध्यक्ष व माजी जि.प. सदस्य कृष्णा गिदी यांचे निधन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे माजी अध्यक्ष माजी जि.प. सदस्य कृष्णा बालोजी गिदी यांचे आज त्यांच्या राजपुरी येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले.

रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर पाटील यांचे विश्वासू सहकारी असणारे कृष्णा गिदी हे शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांच्या निधनाने शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सुप्रिया पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.

Exit mobile version