दिवेआगर कबड्डी प्रिमियर लीग

| बोर्लीपंचतन । वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे भट्टीचा विभाग, सुमित पाटील क्रीडा नगरी येथे श्री. सुवर्ण गणेश कबड्डी संघ दिवेआगर, तृतीय क्रीडा महोत्सव दिवेआगर कबड्डी प्रीमियर लीग पर्व – पहिले भव्य कबड्डी स्पर्धा 11, 12 मार्च रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. श्री. सुवर्ण गणेश दिवेआगार संघावर एक गुणांनी मात करीत प्रथम क्रमांक सोमजाई श्रीवर्धन संघाने विजय पटकवला. तर दृतीय क्रमांक – श्री सुवर्ण गणेश दिवेआगार, तृतिक क्रमांक – कानोबा प्रसन्न श्रीवर्धन, चतुर्थ क्रमांक – शोल्क गारमेंट खरसई, सामन्यातील उत्कृष्ट, चढाई – अजय भायदे (श्री. सुवर्ण गणेश), उत्कृष्ट पक्कड – सिद्धांत वाणी, (कानोबा प्रसन्न) पब्लिक हिरो – रोशन कांबळे, (शोल्क गारमेंट) सर्वोत्कृष्ट खेळाडू शिवम वाणी (सोमजाई श्रीवर्धन) या भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन दिवेआगारचे सरपंच सिद्धेश कोसबे यांनी केले होते. प्रथम पारितोषिक मिळालेल्या सोमजाई श्रीवर्धन या संघाला प्रशिक्षक निलेश भुवड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Exit mobile version