| रसायनी | वार्ताहर |
चौक वावंढळ गावची दिव्या अविनाश कदम ही सी.बी.एस.ई.बोर्ड परिक्षेत इयत्ता 12 परीक्षेत 92.40 टक्के गुण प्राप्त करून उत्तीर्ण झाल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. चौक वावंढळ या कोयना प्रकल्पग्रस्त गावातील अविनाश विठ्ठलराव व विणा अविनाश कदम यांची दिव्या कन्या आहे. लहानपणापासून शिक्षणाची आवड आहे. वडील अविनाश कदम व आई वीणा कदम यांच्या समान शाळेतील शिक्षकांचा ही वाटा आपल्या यशात असल्याचे तिने सांगितले. दिव्या ही रिलायन्स फाऊंडेशन शाळेची विद्यार्थीनी आहे. वावंढळ गावाला लष्करात मोठा मान प्राप्त करून देणारे कॅप्टन विठ्ठलराव नारायणराव कदम यांची दिव्या नात आहे.