। तळा । वार्ताहर ।
द.ग. तटकरे महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. दिवाकर धोंडू कदम यांच्या संशोधन पेपरचा समावेश युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिका यांनी प्रकाशित केलेल्या आयजीआय, ग्लोबल सायंटिफिक पब्लिशींग सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट फॉर रुरल रिजन्स या आंतरराष्ट्रीय पुस्तकात करण्यात आला आहे. या पुस्तकात त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रातील घनकचरा व्यवस्थापनासाठी सामुदायिक सहभाग आवश्यक असून, तो शाश्वत विकास आणि सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाचा आहे. यावर संशोधन सादर केले आहे. ग्रामीण भागांमध्ये अनेक आव्हाने जसे की, अपुर्या कचरा गोळा करण्याच्या सुविधा, अयोग्य विल्हेवाटीच्या पद्धती आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनाच्या पद्धतींबाबत जागरूकतेचा अभाव दिसून येतो. या अभ्यासामध्ये स्थानिक समुदायांना घनकचरा व्यवस्थापनात सहभागी होण्यासाठी कसे प्रेरित करता येईल, यावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
दिवाकर कदम झळकले आंतरराष्ट्रीय पुस्तकात
