। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील नेरळ जवळील जिते गावातील विठ्ठल रखुमाई मंदिरात दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रायगड भूषण भजनी बुवांनी संगीत अभंग सादर करून जिते ग्रामस्थांची दिवाळी पाडव्याची सकाळ रम्य केली.
जिते गावातील बुवा विजय घरत यांनी बांधलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात पाडव्याच्या मुहूर्तवर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमात रायगडभूषण चंद्रकांत निमणे आणि प्रणित निमणे यांनी अभंग सादर करून ग्रामस्थांची सकाळ रम्य केली. त्यांना पखवाज वर रायगड भूषण वादक छगन निमणे यांनी साथ दिल्याने हि भजनाची आणि अभंगाची मैफल अधिकच रंगली. त्याचवेळी बांधिवलीकर गायक वृंद यांनी साथ दिल्याने जीते गावातील मंदिरात साजरी झालेली हि पहिलीच दिवाळी पहाट ग्रामस्थांच्या स्मरणात राहील असे मंदिराचे संस्थापक विजय महाराज घरत यांनी सांगितले.