निराधारांची दिवाळी होणार गोड

| बोर्ली पंचतन | वार्ताहर |

श्रीवर्धन तालुक्यातील विविध निराधार योजनेतील दोन हजार पाचशे पात्र लाभार्थ्यांना एकूण 29 लाख 42 हजार रुपये निधीचे वाटप बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. त्यामुळे निराधार लाभार्थींची दिवाळी गोड होणार असल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार प्रथमेश भुर्के यांनी दिली.

श्रीवर्धन तहसील कार्यालयाच्या वतीने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी वृध्दपकाळ योजना यासारख्या विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांसाठी निधी प्राप्त झाला होता. सदरील निधी विनाविलंब तात्काळ लाभाथींच्या बँक खात्यात जमा करण्याबाबत बँकाना निर्देश देण्यात आले आहेत. बँकानी अनुदान वाटपात दिरंगाई करू नये व दिवाळीपूर्वी सर्व अनुदान लाभाथींच्या खात्यात जमा करावेत, असे निर्देश बँकाना देण्यात आले आहेत. याबाबत कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क साधावा, असे आवाहनही भुर्के यांनी केले आहे.

Exit mobile version