आधार कार्डची झेरॉक्स शेअर करू नका…… UIDAI चे निर्देश

आधारकार्ड ही अत्यावश्यक बाब असून अनेक महत्त्वाच्या बाबीमध्ये आधारकार्ड महत्त्वाचे कागदपत्र असतं. आता या आधारकार्डबाबत युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने लोकांना लोकांना सतर्क केले आहे.

UIDAI ने लोकांना निर्देश देताना म्हटले आहे की आधार कार्डच्या फोटोकॉपी कोणत्याही संस्थांसोबत शेअर करू नका, कारण त्याचा गैरवापर होत आहे. UIDAIने प्रोटेक्टेड आधार वापरण्यास सुचवले आहे जे तुमच्या आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दाखवते. जे अधिकृत वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in.वरून डाउनलोड करु शकतात. UIDAI ने सांगितले की कोणत्याही आधार क्रमांक https://myaadhaar.uidai.gov.in/verify येथे व्हेरीफाय केले जाऊ शकतात. ऑफलाइन पडताळणी करण्यासाठी, तुम्ही mAadhaar मोबाइल अँप्लिकेशनमध्ये QR कोड स्कॅनर वापरून eAadhaar किंवा आधार लेटर किंवा आधार PVC कार्डवरील QR कोड स्कॅन करू शकता.

UIDAI म्हणते की ई-आधार डाउनलोड करण्यासाठी इंटरनेट कॅफे सारखी सार्वजनिक संगणक वापरणे टाळा. डर तुम्ही असे केल्यास त्या संगणकावरून ई-आधारच्या डाउनलोड केलेल्या सर्व कॉपी कायमस्वरूपी हटवल्याची खात्री करा.फक्त ज्या संस्थांनी UIDAI कडून युजर परवाना घेतला आहे तेच एखाद्या व्यक्तीची ओळख व्हेरीफाय करण्यासाठी आधार वापरू शकतात.
हॉटेल्स किंवा फिल्म हॉल सारख्या विनापरवाना खाजगी संस्थांना आधार कार्डच्या कॉपी गोळा करण्यास किंवा ठेवण्याची परवानगी नाही. आधार कायदा 2016 अंतर्गत हा गुन्हा आहे. जर एखाद्या खाजगी संस्थेने आधार कार्ड पाहण्याची मागणी केली किंवा आधार कार्डची कॉपी मागितली तर त्यांच्याकडे UIDAI कडून वैध युजर परवाना असल्याची पडताळणी करा, असेही UIDAIने सांगितले.

Exit mobile version