गुंतवणुकीच्या प्रलोभनातून डॉक्टरला कोट्यवधींचा गंडा

| पनवेल | वार्ताहर |

शहरातील एका हॉस्पिटलमधील डॉक्टरला ऑनलाइन गुंतवणुकीच्या प्रलोभनातून तब्बल 3 कोटी 32 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर येथे राहणारे 57 वर्षीय डॉक्टर नवी मुंबईतील एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंबंधी एक जाहिरात दिसली. या जाहिरातीला घुलताना डॉक्टरने आयपीओ ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांना व्हॉट्सॲपवर लिंक पाठवण्यात आली. तसेच 22 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत विविध खात्यांमधील तब्बल 3 कोटी 32 लाख रुपये काढण्यात आले. पण नफ्याचे 50 लाख रुपये काढण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना पैसे काढता आले नाहीत. त्यामुळे फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.

Exit mobile version