डॉक्टर दाम्पत्यांचा कोरोना योद्धाने सन्मान

खरोशी । वार्ताहर ।
कोरोना महामारीचे संकट समाजावर आल्यानंतर आपल्या जिवाची परवा न करता शेकडो कोरोना बाधितांचे जीव वाचवणारे सामाजिक बांधिलकी जोपासणारे डॉ.संजय ठाकूर व त्यांच्या पत्नी डॉ.रूपाली ठाकूर यांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

कोरोना काळात दादर पेण येथील डॉ.संजय ठाकुर यांनी आपली सेवा दररोज अहोरात्र सेवा सुरू ठेवली होती. एखादा गरीब जर उपचारासाठी आला त्यांच्याकडुन आपल्या सेवेचे पैसे न घेता उलट त्यास उतार खर्चासाठी पैसे देणे, त्याची आपुलकीने विचारपूस करणे त्याला औषध घेण्यासाठी सुधा पैशाची व्यवस्था करणे अशा पद्धतीने ग्रामीण भागातल्या तरुणांचे देवदूत बनून असल्याने त्यांची वैद्यकीय सेवा आपल्या पत्नी सहित सुरू ठेवली होती. त्यांच्या या कार्याची नोंद साई सेवा मंडळ उर्णोली पेण मधील सदस्यांनी घेऊन नवरात्री उत्सवात भव्य मंदिराच्या प्रांगणात महिला भगिनींच्या हस्ते शंभर दिव्यांनी त्यांचे औक्षण करून डॉ. संजय ठाकुर यांना कोरोना योद्धा सन्मान देऊन तसेच त्यांच्या सौभाग्यवती डॉ.रुपाली संजय ठाकुर यांना कोरोना योद्धा सौभाग्यवती सन्मान देऊन गौरविण्यात आले.

Exit mobile version