अलिबागमधील ‘या’ डॅाक्टरला रुग्णाकडून मारहाण

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाने मध्यरात्री अचानक डॉक्टरवर सलाईनच्या स्टँडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत डॉक्टरचा डावा डोळा निकामी झाला आहे. याबाबत रुग्णांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हिड केअर सेंटरमध्ये लोणारे येथील एका रुग्णांवर चार दिवसांपासून उपचार सुरू होते. मध्यरात्री २.३० च्या सुमारास डॉ स्वप्नदीप थळे काम करीत होते. त्यावेळी अचानक या रुग्णाने डॉक्टरच्या मागून येऊन सलाईनचा स्टॅन्ड डोक्यात मारला. या हल्ल्यात डॉ. स्वप्नदीप थळे गंभीर जखमी झाले असून त्यांचा डावा डोळा निकामी झाला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डॉक्टरांवरील हल्ल्याची ही तिसरी घटना आहे.

Exit mobile version