। पनवेल । प्रतिनिधी ।
कळंबोलीत एका 59 वर्षीय डॉक्टरने एका महिलेला लग्नाच्या भूलथापा देऊन गेल्या सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार केला. तसेच, तिला लग्नास नकार देऊन मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कळंबोली पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी डॉक्टर नेरूळ येथे राहण्यास आहे. त्याचा कळंबोली परिसरात दवाखाना आहे, तर 49 वर्षीय पीडित महिला त्याच भागात राहण्यास असून दोघेही विवाहित आहेत. डॉक्टरने पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेऊन पीडित महिलेसोबत विवाह करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र डॉक्टरने तिला नकार देऊन मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
लग्नाचे आमिष दाखवून डॉक्टरकडून लैंगिक अत्याचार
