नरेंद्र गोखले यांना डॉक्टरेट पदवी बहाल

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागमधील नरेंद्र गोखले यांना समाजसेवेबद्दल वॉशिंग्टन डिजिटल युनिर्वसिटी अमेरिकेमार्फत मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

नरेंद्र गोखले हे आरसीएफ कंपनीत गेल्या 32 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी रायगड जिल्हा परिषद आयोजित शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी संगणक तज्ञ मार्गदर्शक म्हणून 2011 ते 2013 या कालावधीत सलग तीन वर्षे काम केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सरेभाग शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय तयार करून दिले आहे. वीटभट्टी कामगारांच्या शाळेसाठी आर्थिक मदत केली आहे. अलिबागमधील वात्सल्य ट्रस्टमध्ये स्थानिक समितीवर सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत.

रायगड जिल्ह्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य त्यांनी दिले आहेत. परिवर्तन सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे तांत्रिक सल्लागार म्हणून पदावर आहेत. आरसीएफ क्वालिटी सर्कल सादरीकरणासाठी त्यांना व त्यांच्या टीमला पाठविण्यात आले होते. त्यात त्यांनी पंधरा वर्षात 15 सुवर्णपदक मिळविले असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर बँकॉक येते सुवर्ण पदक मिळविले आहे.

Exit mobile version